Tuesday, May 20, 2014

हॉटेल सन्मान, अलिबाग

अलिबागला लोक दोन कारणांसाठी येतात, एक तर पर्यटनाला किव्वा सन्मान मध्ये जेवायला. आलिबागच्या गजबजलेल्या वस्तीत असलेलं हे छोटेखानी हॉटेल सीफूडसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. इथे यायचं असेल तर लंच टाइमच्या अगोदर आलेलं अतिउत्तम नाहीतर १५/२० मिनिटांच्या वेटिंग टाईमची निश्चिंती!
 
अस्सल कोंकणी पद्धतीचं जेवण इथे मिळतं. पापलेट थाळी, चिकन थाळी, मटण, जिताडा, कोलंबी मसाला हे इथले हॉट सेलिंग आयटम्स. इथली पापलेट थाळी व चिकन वडे अगदी MUST TRY आहे. इथल्या फिश थाळी मध्ये तुम्हाला मिळेल; आमटी, फिश फ्राय, सोल कढी, सुका जवळा भाजी, चपाती/भाकरी आणि राईस तर चिकन थाळी मध्ये वाडे/चपाती/भाकरी, भात, चिकन मसाला, चिकन रसा , सोल कढी आणि राईस. प्रत्तेक पदार्थ फ्रेश आणि तितकाच चवदार!
 
अतिशय साधारण दिसणाऱ्या या हॉटेल ने नुकतीच कात टाकलीय. आता इथे AC / NON-AC असे दोन सेक्शन्स आहेत. त्याचप्रमाणे बाहेर वेटिंग साठी उत्तम सोय आहे. इथे अप्रतिम अशी टेंडर कोकोनट जेली मिळते जी  MUST TRY  आहे. अलिबागची आठवण घेवून जाण्यासाठी इथे कांद्याच्या माळा, सुके आवळे, सुकट व इतरही सुके पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
 
इथला मेन्यू थोडा Overpriced आहे खरा पण चवदार कोंकणी जेवण एकदा चाखायला काय हरकत आहे?