पहिलाच लांबचा प्रवास अन त्यात इंटरनेटवरून शोधाशोध केलेलं हॉटेल, त्यामुळे प्रचंड धाकधुक होती इथे येताना. बरेच reviews वाचल्या नंतर ओपलची निवड केली होती. प्रत्यक्षात पुढ्यात काय येइल याबद्दल मन शाशंक होतं पण ओपल आमच्या पसंतीस खरं उतरलं.
हॉटेल मधल्या रूम्स elegantly सजव्ल्या नसल्या तरी टापटीप आणि स्वच्छ आहेत. २४ तास गरम आणि थंड पाणी, हवेशीर खिडक्या आणि उत्तम रूम सर्व्हिस. फ्रंट साइडच्या रूम्सना चांगला view आहे. हॉटेल समोर छोटेखानी ल्यांडस्केप गार्डन आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला स्टाफ खूप छान आहे एका फोनवर तुमचं काम होतं शंभर वेळा आठवण करावी लागत नाही. गेस्ट हाऊसच्या बाजूला प्रशस्त Dining Hall आहे. दुपारी आणि रात्रि इथे प्रचंड गर्दी असते....अर्थातच इथल्या अप्रतिम जेवणामुळे सकाळी नाश्त्याला इथे उपमा किंवा पोहे, sandwich, गोड शिरा, मिसळ आदि पदार्थांची रेलचेल असते. तर लंच आणि डिनर मध्ये सॉलिड वेरायटी असते....व्हेज थाळी मध्ये २/३ प्रकारच्या भाज्या, रायतं, चपाती, डाळ, भात तर नॉन व्हेज मधे ताम्बडा, पांढरा(unlimited) रस्सा ते चिकन लॉलीपॉप, मालवणी चिकन, चायनीज डिशेस इत्यादि वेरायटी आहेत. मेन कोर्स तर मेन कोर्स इथले डेजर्ट्स पण यम्मी होते. फ्रूट सलाड विथ कस्टर्ड ची तर मी डाय-हार्ड fan झाले होते .....तर आमची पिल्लू पार्टी रस मलाई वर बेहद खुश होती. एकंदर इथल्या Dining Hall वर आम्ही भलतेच खुश होतो.(आहोत)
इथे फिरायला जर तुम्हाला vehicle हवी असेल तर हॉटेल तुम्हाला अरेंज करून देवू शकतं. इथला कायमचा लक्षात रहाण्यासारखा प्रसंग म्हणजे...मी निघायच्या गडबडीत आमची एक bag हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये विसरून आले. ट्रेनमध्ये बसेपर्यंत ही गोष्ट आमच्या लक्षात आली नव्हती. इतक्यात हॉटेल मधून फोन आला आणि त्यांनी आमची bag स्टेशनपर्यंत आणून द्यायची व्यवस्था केली तेसुद्धा ट्रेन सुटायला ५ ते ७ मिनिटं बाकि असताना.