गेल्या आठवड्यात या ठिकाणी जायचा (भयंकर) योग आला. वीकेंडला इथली सगळी हॉटेल्स फुल असतात. मग जिथे जागा मिळेल तिथे पोट भरायच त्यातूनच आम्ही Spagheti Kitchen मधे धड्कलो. दुपारच रणरणतं ऊन अन पोटात भयंकर आग पडली होती नेहेमी पेक्षा वेगळ काहीतरी खाव म्हणून इथे आलो. बरेच दिवसांपासून पास्ताही खायचा होता. मेनू कार्ड पाहिल तर सगळ्या डिशेस ४००+ रु. होत्या त्यातुनाही धीर करून १ Penne Pesto अन एक Thin crust pizza मागवला जो around ५५०/६०० रु. होता.
जवळजवळ २५ ते ३० मिनिटानी Penne Pesto उगवला. Penno कसला Spagheti होती ती. एका मोठ्या डिश मध्ये serve केलेली अन एका व्यक्तीलाही न पुरणारी. या नंतर पोट भरण्यासाठी आधार होता तो फ़क्त ऑर्डर केलेल्या पिझ्हाचा. जो बघून फ़क्त चक्कर यायची बाकि होती. पापड़ किव्वा त्यापेक्षाही पातळ असा pizza base त्यावर १ मिलीमीटर पेक्षाही कमी cheese ची लेअर होती अन त्यावर कुठे कुठे पडलेले toppings होते. त्या पेक्षा आपल्याकडे मिळणारे मसाला पापड तरी टेस्टी असतात. दोन्ही पदार्थाना काडिचिही चव नव्हती. शेवटी पिझ्हाचे २ तुकड़े टाकुन आम्ही ११०० रु बिल देवून तेथून बाहेर पडलो...ते पुन्हा या ठिकाणी परत चुकुनही न बघण्यासाठी।
0 comments:
Post a Comment
I appreciate your feedback and comments. Please stop by again.