Friday, June 11, 2010

सम्राट: चर्चगेट

आमच्या घरी जर कोणाचे वाढदिवस असतील अन ते आमच्या veg खायच्या दिवशी आले असतील तर ते इथे तिथे जायचा विचार न करता आम्ही सम्राटमधेच सेलीब्रेट करतो. कारण तुमच्या big day साठी सम्राट मध्ये complete solution आहे. इथे ऑफिस एरिया असल्याने नेहेमीच खुप गर्दी असते तेव्हा इथे येताना १ तास तरी लवकर आलेलं बरं. चर्चगेटला असलेल्या जुन्या शाकाहारी हॉटेल्स पैकी हे एक आहे.

इथे मेनू मध्ये बरीच वरायटी आहे. थाळी, इडली-डोसे, सैंडविच, छोले भठूरे ते कौनटिनेंटल पर्यंत. सूप, स्टार्टस ते desserts पर्यन्त हव्या असलेल्या जवळजवळ सगळ्याच पदार्थांची इथे रेलचेल आहे. जर कोणाचा वाढदिवस सेलीब्रेट करायचा असेल तर केकही बाहेरून आणायला नको तो ही यांच्या 210 degrees या केकशॉपमध्ये मिळतो. 210 degrees मध्ये केक व्यतिरिक्त बेकरी items ही छान मिळतात वेज पफ, पनीर रोल, टार्ट इत्यादी. त्याचबरोबर छोटसं आइसक्रीम पार्लरही आहे इथे.

दुमजली असलेलं हे हॉटेल बरच प्रशस्त व नीटनेटकं आहे. Service तर quick आहेच पण इथल्या जेवणाची क्वालिटी ही छान maintain केलेली आहे।

पत्ता: प्रेम कोर्ट, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट
फोन: ४२१३५४०१, २२८२००२२, २२८२५८०९, २२८२०९४२

Wednesday, June 9, 2010

चेतना: फोर्ट

काळा घोडा फेस्टिवलला जाणाऱ्या प्रत्तेकालाच हे होटेल माहित असेल. या फेस्टिवल मध्ये चेतनाचाही फ़ूड स्टॉल असतो ज्यात उत्तम ढोकळा व मिठाया मिळतात. मी जेव्हा जेव्हा काळा घोडा फेस्टिवलला जाते या ठिकाणी आवर्जून जाते ती इथल्या राजस्थानी बाटीसाठी.

इथे थाळी मध्ये ३ प्रकार मिळतात राजस्थानी, गुजराती अन मराठी. पण लक्षात राहण्यासारखी आहे ती राजस्थानी थाळी. मराठी जेवण कदाचित रोज़ जेवत असल्याने त्याचे फारसे अपरूप नाही वाटले नॉन-महाराष्ट्रियन लोकानी मात्र जरुर try करावे इथले अस्सल मराठ्मोळे जेवण. राजस्थानी थाळी मध्ये ढोकळा, बटाटा वडा, छोटी पूरण पोळी, शिरा, ज्वारी-बाजरीच्या भाकरया, पोळया, पुरया, खिचड़ी, पुलाव, ३ भाज्या, दही कड़ी, दाल बाटी, चूरमा लाड़ू व आइसक्रीम असा भरगच्च मेनू असतो. इथली बाटी म्हणजे पैसे वसूल. दाल मधे कुस्करून खाण्यापेक्षा मला ती नुसतीच खायला आवडते अन विशेष म्हणजे त्यालाही त्याची अशी विशिष्ट चव असते. मी इतर ठिकाणी खालेल्ल्या बाटया म्हणजे पिठाचे नुसते तळलेले गोळे होते..मी इथल्या बाटीची die hard fan आहे.

इथल्या थाळींची average प्राइज आहे २८० ते २९० रु. फोरेनर्सची इथे नेहेमीच ये जा असते।

पत्ता: ३४, के दुभाष मार्ग, काळा घोडा, फोर्ट
फोन: २२८४४९६८, २२८२४९८३

बार्बेक्यू नेशन: खार

Barbeque Nation बद्दल फार ऐकलं होतं, ऑफिस पार्टी च्या निमित्ताने इथे जाण्याचा योग आला. हॉटेल तसं बर्यापैकी मोठं आहे पण खवय्यांची नेहेमीच गर्दी असल्यामुळे इथे सहजासहजी प्रवेश मिळत नहीं इथे यायचं म्हणजे बुक करुनच आलं पाहिजे. वीकेंडला सहज जावून entry मिळण तर अशक्यच. तुम्हाला वीकेंडला इथे यायच असेल तर २/3 दिवस आधी बुक करावं लागतं.

Barbeque Nation फेमस आहे ते इथल्या unlimited कबाब्ससाठी. आमच्यामधली काही मंडळी vegeterian असल्यामुळे दोन्ही प्रकारचे कबाब्स टेस्ट करता आले. Nonveg मधे चिकन, फिश, प्रौंस, मटन कबाब्स serve केले जातात तर veg मधे kajun potato, पनीर, मशरूम. टेबलच्या मधोमध खाचेमध्ये Barbeque बसवला होता त्यावर शिगेला लावलेले कबाब आणून serve केले जातात. आपल्या आवडीनुसार आपण कबाब ऑर्डर करू शकतो..ते ही पोट फूटेपर्यंत. Nonveg कबाब अपेक्षेप्रमाने सॉफ्ट अन मीडियम spicy होते तर veg कबाब तर अप्रतिमच होते especially काजून potato.

इथे मेंन कोर्स मधे ही बरीच वेराइटी आहे. २/3 प्रकारची सूप्स, ४/५ प्रकरची सलाड्स, veg/nonveg राईस, नूडल्स, crabs, इंडियन ब्रेड्स इत्यादी पण यातली लक्षात ठेवण्यासारखी एकही डिश नाही. कबाब्स नंतर interesting part म्हणजे इथले desserts. गुलाब जाम, फिरनी, chocolate dessert, ice cream, केक व फ्रूट्स. कबाब्स नंतर डायरेक्ट डेजर्टवर ताव मारलात तरी तुमचे पैसे वसूल. ४५०(per pesron) रुपयात अजुन काय हवं?

पत्ता: तळ मजला, ओम प्यालेस, खार(पश्चिम)
फोन: ६६८२४४३४, ६५९३८३९३, ६५९३४३४३, ९३२३९०५५९२

गुरुकृपा: सायन

ओल्ड एस आय इ एस कॉलेजच्या जवळ असलेल जवळजवळ २० ते २५ वर्ष जुनं किव्वा त्या पेक्षाही जुनं हे होटेल. इथली स्पेशिअलिटी म्हणजे रगडा समोसा आणि रगडा प्याटिस. कधीही जा लोकं इथे तुटून पडलेली असतात समोसा अन प्याटिसवर. इथले सगळेच पदार्थ अप्रतिम असतात. मग ती भेळ असो वा मिठाई. मी इथे १० ते १५ वर्षांपासून येतेय पण अजुनही तीच चव कायम आहे. जवळच कॉलेज असल्यामुळे इथे नेहमी गजबज असते.

इतर must try करण्यासारखे पदार्थ म्हणजे मिक्स भज्जी जी रगइया बरोबर serve करतात. भेल पूरी, पानी पूरी, grill sandwich, कुल्फी फालूदा आणि बरच काही. इथल्या किंमतिही अगदी nominal आहेत. तुम्ही १०० रु. मधे अगदी पोटभर खाऊ शकता. इथे प्रत्तेक प्रकारासाठी वेगळे sections आहेत. चाट section, स्वीट्स section, आइसक्रीम section. इथल्या snacks इतकीच इथली मिठाईही तितकीच लोकप्रिय आहे. सणासुदिला आदल्या दिवशी पासून इथे गर्दी होते. गुलाबजाम, मावा बर्फी, गाजर हलवा ते रस मलई पर्यन्त अनेक उत्तम असली घी मधे बनलेल्या मिठाया इथे मिळतात.

हॉटेल ग्रेट पंजाब: दादर(पू)

ग्रेट पंजाब हे माझ ऑल टाइम फेवरेट हॉटेल, इथल्या चिकन बिर्याणीला कोणाची कॉम्पिटिशन असूच शकत नाही तुम्ही खुप दिवसानी इथे जा, खुप महिन्यानी किवा खुप वर्षानी तुम्हाला तीच चव मिळेल. ऑथेंटिक पंजाबी चिकन बिर्याणी हवी असेल तर ग्रेट पंजाबला पर्याय नाही. इथले कबाब्स आणि ग्रेव्हिजही तितक्याच चवदार असतात. इथे खाण्यासारखे इतर पदार्थ म्हणजे बटर चिकन, कड़ाई चिकन, चिकन लाहोरी कबाब या बरोबर जो हॉट गार्लिक सॉस मिलतो तो अप्रतिम असतो व्हेज मधे लाहोरी सब्जी, पनीर टिक्का, व्हेज ट्रिपल शेझ्वान ट्राय करण्यासारखे आहेत.

छान खायच तर त्यासाठी पैसेही बरयापैकी मोजावे लागतात. इथे एव्हरेज डिश २०० रु आहे पण पैसे वसूल होण्याची पूर्ण खात्री. ऑर्डर दिल्यापासुन १० ते १५ मिनिटात पदार्थ सर्व्ह केले जातात तसेच आपल्या आवडीनुसार पदार्थात बदल करून दिले जातात. एकदा तरी ट्राय करायला काहीच हरकत नाही

पत्ता: १८६, प्रकाश मेंशन, फायर ब्रिगेड समोर, दादर (पूर्व)
फोन: २४११४९४६, २४११४७१३